व्हिडिओकॉनचा देशात पहिला सोलर एसी


नवी दिल्ली – एअर कंडीशनरने येणार्‍या भरमसाठ वीजबिलामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना व्हिडिओकॉन कंपनी दिलासा देणार आहे. या कंपनीने असा एसी बनविला आहे ज्यामुळे तुमची वीजबिलातून सुटका होणार आहे. व्हिडिओकॉनचा हा हायब्रिड सोलर एसी सुर्याच्या ऊर्जेवर चालणार असून तो पर्यावरणाचे संरक्षणही करणार आहे. भारतातील हा पहिला सोलर एसी व्हिडिओकॉन कंपनीने तयार केला आहे.

वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणारा आणि वीजबिलातून सुटका करणारा एसी असावा अशी मागणी वाढली होती. या दोन्ही गोष्टी असलेला एसी व्हिडिओकॉनने सौर उर्जेवर चालणारा एसी बाजारात आणला आहे. तसेच हा एसी पर्यावरण पुरक असल्याने बाजारात त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

व्हिडिओकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (एसी डिव्हिजन) संजीव बक्शी यांनी सांगितले की, भारतात एसीची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. व्हिडिओकॉनने ग्राहकांना प्रत्येकवेळी सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट दिले आहे. असेच एक सर्वोत्कृष्ट हायब्रिड एसी कंपनी बाजारात उपलब्ध करून देत आहे. या एसीच्या सोलर पॅनलची 25 वर्षे लीनियर पावर आटपुट वॉरंटी आणि 10 वर्षे पॅनलची वॉरटी देण्यात येत आहे. या एसीमुळे ग्राहकांची भरमसाठ येणार्‍या वीजबिलापासून सुटका होणार आहे.

Leave a Comment