मारुती सुझुकीची नवी व्हॅगनआर व्हीएक्सआई प्लस लाँच


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीने व्हॅगनआर लिमिटेड एडिशनची व्हीएक्सआई प्लस नुकतीच लाँच केली असून या नव्या व्हॅगनआर कारमध्ये ऑटो गिअर शिफ्ट ऑप्शन देण्यात आला आहे. त्याचबरोबर या कारमध्ये १.० लिटर 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले असून ६७बीएचपीची पॉवर आणि ९०एनएमचा पीक टार्क जनरेट करता येऊ शकतो. तसेच ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यात ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट देण्यात आले आहे. या कारमध्ये क्रोम डिझाइनसह नवी प्रोजेक्टर हेडलॅम्पस्, लार्जर प्रंट बंपर आणि प्लास्टिकपासून कव्हर केलेले राऊंड फोगलॅम्पस् देण्यात आले आहेत. या कारची ४ लाख ६९ हजार रुपयांपासून ५ लाख ३६ हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

Leave a Comment