नवी दिल्ली – आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी आपल्याला पासवर्ड किंवा पिनची आवश्यकता भासणार नसून तुम्हाला थेट पैसे मिळणार आहे. यापुढे एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होईल. मात्र, पासवर्डऐवजी तुमच्या बोटाची किंवा अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी बँकांकडून खातेदारांचे आधार नंबर लिंक करण्याचे म्हणजे डाटाबेस बनविण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुढील काही महिन्यांतच तुम्हाला विना पिन किंवा पासवर्ड पैसे मिळणार आहेत.
आश्चर्यम्! आता एटीएममधून विना पिन आणि पासवर्ड मिळणार पैसे
सध्या एटीएमची पिन किंवा पासवर्ड नंबर चोरून खात्यातील पैसे काढण्याच्या अनेक तक‘ारी येत आहेत. यासाठी एटीएम मशीनला बायोमेट्रिक उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे चोरी होण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. आधार कार्ड बनविताना हातांच्या चार बोटांची आणि अंगठ्याचे ठसे घेण्यात आले आहेत. त्यापैकी एका ठशाच्या मदतीने तुम्ही यापुढे एटीएममधून पैसे काढू शकणार आहात.