पाकमधील कनिष्क स्तूप आठवे आश्‍चर्य?


पेशावर – पाकिस्तानमधील अतीप्राचीन बुद्ध स्मारक असलेल्या कनिष्क स्तूपचे बांधकाम हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे या स्मारकाला जगातील आठवे जागतिक आश्‍चर्य म्हणून दर्जा मिळावा, यासाठी पाकीस्तानने युनेस्कोकडे मागणी करावी, असे आवाहन अमेरिकी इतिहासकार अमजद हुसैन यांनी केले आहे.

पेशावर येथील व्हिक्टोरिया हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अमजद हुसैन म्हणाले, पेशावर येथील कनिष्क स्तूप जगातील एक महत्त्वपूर्ण संरचना आहे. याचे बांधकाम उल्लेखनीय असून त्याचा अनेक ऐतिहासिक पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे जगातील आठव्या आश्‍चर्याचा दर्जा मिळाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कनिष्क स्तूपला जागतीक आश्‍चर्याचा दर्जा मिळविण्यासाठी पाकिस्तानने जपान आणि चीनच्या मदतीने युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविला पाहिजे, असे मत त्यांनी नोंदविले.

कनिष्क स्तूपबद्दल माहिती देताना ते म्हणाले, पेशावरपासून काही अंतरावर असलेल्या गुंज गेट ज्याला ङ्गशहा जी की डेरीङ्ख असे संबोधले जाते तो हा स्तूप आहे. पहिल्या शतकात कुशान कनिष्क यांच्या काळात हा बांधण्यात आला होता. वास्तुस्थापत्यानुसार बांधलेली ही वास्तू आशिया खंडातील सर्वात उंच आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या असलेल्या तेरा मजली इमारती एवढी हा स्तुप उंच असून त्याच्या शेजारी असलेला मठ हा बौद्ध धर्मोपदेशक वसुबंध व पर्व यांच्याशी संबंधीत आहे. या भागातून बुद्ध धर्म लयाला गेल्यानंतर कनिष्क स्तूप व बौद्ध मठाचा शोध घेणे बंद झाले, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment