जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाची व्होडाफोनशी हातमिळवणी!


टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या आगमनामुळे इतर टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्यांना घाम फुटला आहे. त्यांच्या समोर आपली ग्राहक संख्या वाढवण्याचे लक्ष आहे. त्यातच जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्या एकमेकांशी हातमिळवणी देखील करू शकतात. त्याचबरोबर टेलिकॉम क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या एअरटेलला आपले स्थान देखील गमवावे लागू शकते.

दरम्यान टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या आगमनाने इतर टेलिकॉम कंपन्यांचे भारी नुकसान झाले आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून टेलिकॉम क्षेत्रातील तिसरी मोठी कंपनी असलेली आयडियाचे व्होडाफोनमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या विलिनीकरणानंतर या दोन्ही कंपन्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी होऊ शकते. दरम्यान याबाबतीत दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

Leave a Comment