एचडीएफसी बँकेत सर्व्हीस रोबो


मुंबईच्या कमला मिल्स शाखेत एचडीएफसी बँकेने इंटरअॅक्टीव्ह ह्युमनाईड रोबो आयआरए (इरा) लाँच केला असून बँक कर्मचार्‍यांच्या मदतीने तो ग्राहक सेवा करण्यास सहाय्य करणार आहे. कस्टमर सेवेसाठी ह्युमनाईड रोबोचा वापर करणारी एचडीएफसी पहिैली बँक बनली आहे. हा रोबो रिसेप्शन कौंटरपाशी तैनात केला गेला आहे.

कोच्ची येथील असीमोव रोबोटिक्सने हा रोबो रोबोटिक्स व आर्टिफिशियल इंटलिजन्स तंत्राने तयार केला आहे. बेँकेत येणार्‍या कस्टमरना तो कॅश कौंटरसह अन्य कौंटरवर जाण्यासाठीचा मार्ग दाखवेल. प्रथम तो ग्राहकांचे स्वागत करेल व त्यांना बँकेकडून दिल्या जाणार्‍या सेवा यादीची प्रत दाखवेल. त्यातील कोणती सेवा हवी हे ग्राहकाने सांगितले की टेक मी देअर स्क्रीनवरून तो संबंधित जागी पोहोचण्याची दिशा दाखवेल. भविष्यात त्यात आणखीही कांही फिचर्स दिली जाणार आहेत. त्यात व्हाइस व फेस रिकगनिशन, व्हाईस गायडेड नेव्हिगेशन, बॅलन्स इन्क्वायरी,. चेक डिपॉझिट या सुविधा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment