व्हॉट्सअॅप आता आपल्या युझर्ससाठी नवीन फिचर घेऊन येत असून ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या मित्रांचे लोकेशन माहीत करू शकणार आहात. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरचे नाव लाईव्ह लोकेशन्स असे आहे. हे फिचर तुम्हाला तुमच्या मित्राचे रिअल टाईम लोकेशन सांगणार आहे. जेव्हा पासून फेसबुकने व्हॉट्सअॅपची मालकी विकत घेतली आहे तेव्हापासून व्हॉट्सअॅपच्या फिचर्समध्ये नवनवीन फिचर वाढवत आहे.
व्हॉट्सअॅप सांगणार तुमच्या मित्रांचे रिअल टाईम लोकेशन
असे फिचर ट्विटरदेखील आणू शकतो. पण त्यावर अजूनतरी शिक्कामोर्तब झालेले नाही. पण काही तज्ञांच्या मते WABetaInfo नामक वेबपेजवरून हे नवीन एपीके डाउनलोड करू शकता. दरम्यान याची शाश्वती व्हॉट्सअॅपने घेतलेली नाही.