नवी दिल्ली : लवकरच एटीएममधून तुम्हाला २४ हजार रुपये काढता येण्याची शक्यता असून सध्या २४ हजार रुपये एका आठवड्याला काढता येत आहेत. लवकरच एटीएममधूनही २४ हजार काढता यावे यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहेत. एटीएममधून सध्या १० हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे.
लवकरच एटीएममधून काढू शकता २४ हजार रुपये!
याबाबत कॅश लॉजिस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष रितुराज सिन्हा यांच्या मते नोटबंदीनंतर आता देशातील स्थिती सामान्य असून एटीएमवर लागणारी गर्दी देखील कमी झाली आहे. मागील ५ दिवसात एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात कॅश टाकली गेली आहे.