भीम अॅप झाले अपडेट


गेल्या महिन्यात नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने लाँच केलेले एनपीआय आधारित भीम अॅपचे नवे व्हर्जन आले असून त्यात कांही नवी फिचर्स दिली गेली आहेत तसेच त्यातील कांही त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. १.२ व्हर्जन आता हिंदी व इंग्रजीप्रमाणेच सात प्रादेशिक भाषांतही उपलब्ध केले गेले आहे. बंगाली, कन्नड, गुजराथी, मल्याळी, उडिया, तमीळ आणि तेलगू ते उपलब्ध झाले आहे.

या अॅपमध्ये पे टू आधार नंबर पेमेंट ऑप्शन दिला गेला आहे. युजर्स बँक अकौंटशी लिक्ड आधार नंबरवर त्यामुळे पैसे ट्रान्सफर करू शकणार आहेत. यात स्पॅम रिपोर्ट फिचरही दिले गेले आहे. त्यामुळे अज्ञान लोकांनी पैसे रिक्वेस्ट केली असेल तर ती ब्लॉक करता येईल. त्याचबरोबर प्रायव्हसी सेटिंग अपडेट केले गेले आहे. ड्युल सिम स्मार्टफोन साठी सिम कार्डाची निवड करता येणार आहे. पास वर्ड विसरला असेल तर रिस्टोअर करता येईल तसेच बँकेला अडचणी सांगणे व घेतलेले पेमेंट परत करणे या सुविधाही दिल्या गेल्या आहेत.

Leave a Comment