जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची आणखी एक संधी


नवी दिल्ली – 8 नोव्हेंबर रोजी चलनातून बाद केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्याची पुन्हा एकदा संधी देण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँककडून (आरबीआय) एका योजनेंतर्गत ठराविक रक्कम बदलून देण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबरपर्यंत ज्या लोकांना नोटा बदलून घेता आल्या नाहीत त्यांना पुन्हा एकदा नोटा बदलून देण्यात याव्यात, अशी विनंती काही नागरिकांनी आरबीआयकडे केली आहे.

आरबीआय आणि सरकारी अधिकार्‍यांनी सांगितले की, नोटा बदलून देण्यासंदर्भात विचार सुरू असून नोटा बदलून देण्याची सीमा फक्त 2000 रुपये असण्याची शययता आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून वेगळी व्यवस्था करण्यात येऊ शकते.तसेच नोटा बदलून देण्याचा काळावधी कमी ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये. दरम्यान, यापूर्वी आरबीआयला अनेकांनी प्रश्‍न विचारला होता की, ज्या लोकांना दिलेल्या मुदतीमध्ये नोटा जमा करता येणार नाहीत त्या नोटांचे पुढे काय होणार?

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा करत 30 डिसेंबर 2016पर्यंत सर्व पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा आपल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची मुदत दिली होती. काळ्या पैसांवर आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. ज्यामुळे 15.4
लाख कोटी रुपये जे बँकेच्या सिस्टम बाहेर आहेत ते परत बँकेच्या सिस्टममध्ये येतील किंवा कायमच्या रद्द होतील.

Leave a Comment