मौनी अमावस्या : आजची रात्री आहे खास, या गोष्टीची घ्या खबरदारी


आज (शुक्रवार) मौनी अमावस्या आहे. त्यामुळे येणार्‍या काळात तुम्हाला भाग्याची साथ आणि घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे. अमावस्याला सुर्य आणि चंद्र यांचे मिलन होते आणि दोन्ही ग्रह एकाच राशीमध्ये प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मनावर अधिराज्य करणारा देव मानले जाते. अमावस्याच्या रात्री चंद्र लुप्त होतो. ज्या व्यक्तींची नकारात्मक विचारधारा असते, अशा व्यक्तींवर नकारात्मक शक्ती आपला प्रभाव टाकतात. अमावस्याची रात्र ही भूत-प्रेत, पितृ, पिशाच आणि दैत्यांची रात्र असते. कारण अमावस्याच्या रात्री या शक्ति अधिक सक्रिय आणि शक्तिशाली असतात. यासाठी अमावस्याच्या रात्री विशेष सावधानी बाळगली पाहिजे.

अशी घ्यावी खबरदारी

कोणत्याही प्रकारची मनोकामना किंवा इच्छापूर्ती असलेल्यांनी या रात्री सायंकाळ होण्यापूर्वी पिंपळाच्या किंवा वड्याच्या झाडाची पूजा करावी आणि शुद्ध तुपाचे दीवे लावावेत.

नशा येणार्‍या पदार्थांचे सेवन करू नये, विशेषता दारूचे. कारण अमावस्याच्या दिवशी दारूचे सेवन केल्याने शरीरावरच नव्हे तर भविष्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.

पुराणांमध्ये अमावस्या तिथीला देव पितृ मानले जाते. यासाठी या दिवशी पितृंच्या नावाचे स्मरण करावे. तसेच त्यांच्या नावाने ब्राम्हणास शुद्ध शाकाहारी जेवन द्यावे. हे शक्य नसल्यास खीर तरी खाऊ घालावी.

Leave a Comment