तीन रंगात न्हाले गुगलचे डूडल


मुंबई: आज देशभरात ६८ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून सोशल मीडियाही या उत्साहात सहभागी झाला असून प्रजासत्ताक दिनाचे गुगल डूडल तयार करून गुगलनेही या उत्सवात सहभाग नोंदवला आहे. गूगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

डूडलद्वारे गूगलने सलामी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गूगलने खास डूडल बनवले आहे. यात राजपथाचे चित्र तयार करण्यात आले आहे. २६ जानेवारी १९५० रोजी देशात संविधान लागू करण्यात आल्यामुळे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्त दिल्लीतील राजपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडणार आहे. अतिरेक्यांचे कर्दनकाळ ठरलेले ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमानही पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होणार आहे. अबूधाबीचे युवराज मोहम्मद बिन झायेद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत.

Leave a Comment