व्हर्च्यूचा सर्वात महागडा ड्युल सिम स्मार्टफोन सादर


लग्झरी स्मार्टफोन निर्माती कंपनी व्हर्च्यूने त्यांचा कॉन्स्टीलेशन हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत १० फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहे मात्र तज्ञांच्या मते हा आत्तापर्यंतच्या त्यांच्या ड्युल सिम स्मार्टफोनमध्ये सर्वात महाग असेल. कारण आत्तापर्यंतचे या कंपनीचे सर्व स्मार्टफोन महागडे आहेत. कंपनीने नुकत्याच सादर केलेल्या सिग्नेचर स्मार्टफोनची सुरवातीची किंमत ५ लाख रूपये आहे.

कॉन्स्टीलेशनसाठी अॅनोडाईज्ड अॅल्यूनिमियम वापरले गेले आहे व बाहेरच्या बाजूस खास इटालीतून मागविलेले लेदर लावले गेले आहे.५.५ इंची क्यूएचडी अमोलेड डिस्प्ले, स्क्रॅच प्रूफ ग्लास लेयर, स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रो कार्ड लावण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.०, ३२०० एमएएच बॅटरी, ड्युल सिम, फ्रंट फेसिंग स्टीरिओ स्पीकर्स,, डॉल्बी डिजिटल प्लस टेक्नॉलॅजीचा वापर, सफायर डिस्प्ले अशी त्याची फिचर्स असून एक खास बटणही दिले गेले आहे. हे बटण माणकाचे आहे व ते प्रेस करून २४ तास हेल्प सर्व्हिस अक्सेस करता येते.

Leave a Comment