जपानच्या टोक्योमध्ये होणार असलेल्या २०२० च्या ऑलिंपिक्समध्ये प्रेक्षकांना अंतराळातून होत असलेली रंगीबेरंगी उल्कांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. या प्रकारचा प्रयोग जगात प्रथमच केला जात आहे. जपानी कंपनीने त्यासाठी खास उपग्रह तयार केला आहे. या उपग्रहाच्या सहाय्याने जगात कुठेही रात्रीचे आकाश कृत्रिम उल्कांमुळे झगमगून उठणार आहे. या उपग्रहात छोटे छोटे गोळे भरून ते अंतराळात पाठविले जातात व अंतराळातून खाली येताना वायूमंडळात प्रवेश करताच या गोळ्यांचे घर्षणामुळे ज्वलन होते व उल्का पडत असल्याचा भास होतो.
जपानी उपग्रह करणार कृत्रिम उल्कांची आतषबाजी
यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जपानी वैज्ञानिक त्यासाठी रात्रंदिवस काम करत आहेत. उपग्रह आणि त्यातून पाठवायचे गोळे तयार झाले आहेत. निळ्या, हिरव्या, नारंगी रंगाच्या या कृत्रिम उल्का रात्रीचे आकाश रंगीत करतील. उपग्रहातून पाठवायच्या गोळ्यांमध्ये पोटॅशियम, लिथियम, कॉपर यांचा वापर केला आहे. या धातूंना स्वतःचा रंग आहे व ते जळतील तेव्हा वेगवेगळे रंग दिसतील.२०० मीटर उंचीवरून हा उल्कापात केला जाईल.