आबुधाबीची भारतात ७५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक


यंदाच्या ६८ वा प्रजासत्ताकदिनाचे पाहुणे आबुधाबीचे राजकुमार व यूएईचे सुप्रीम कमांडर मोहम्मद बिन जायेद यांनी भारतात आबुधाबी ७५ अब्ज डॉलर्स म्हणजे ५ लाख१० हजार कोटींची गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने पायाभूत सुविधा क्षेत्रात केली जाणार आहे. येत्या १० वर्षात या क्षेत्रात विकास कामांसाठी भारताला दीड ट्रीलियन डॉलर्सही आवश्यकता आहे. हा पैसा खासगी, सरकारी भागीदारीतून तसेच परदेशी गुंतवणुकीतून उभा केला जाणार आहे.

आबुधाबी कडून करण्यात येत असलेल्या गुंतवणुकीतून २०१९ पर्यंत देशातील ७ लाख गावे रस्त्याने जोडली जाण्याचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर रेल्वे मार्ग, बंदरे व विमानतळांचा विकासही केला जाणार आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढती गती लक्षात घेता पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण करणे गरजेचे ठरले आहे. त्यासाठी मोदी सरकार अनेक मार्गांनी गुंतवणूक वाढविण्याचे प्रयत्न करत आहे. आबुधावी करणार असलेल्या गुंतवणुकीबाबतचा करार मार्च २०१६ मध्येच केला गेला होता. ही मदत आता मिळणार आहे.

Leave a Comment