आता कार करेल तुमची पेमेंट


जगभरात कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहन व अनेक नवीन तंत्रे उपलब्ध केली जात असताना वाहनेही या स्पर्धेत मागे नाहीत. लास वेगास येथे सुरू असलेल्या सीइएस २०१७ मध्ये होंडा मोटर्सने सादर केलेली कार आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. ही कार पार्किंग, पेट्रोल, टोल यासारखी पेमेंट तुमचे क्रेडीट कार्ड वापरून करू शकणार आहे. जनरल व किया मोटर्सनीपण या वर्षात त्यांच्या कारमध्ये ही सुविधा दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.फोक्सवॅगनने पे बाय फोन म्हणजे मीटर मोबाईल पेमेंट सुविधा गेल्या महिन्यात उपलब्ध केली आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की अमेरिकेतील नागरिक पार्किंग, पेट्रोल, टोल पेमेंटसारख्या कामांसाठी ४८ निमिटे वाया घालवितात. विजा इंकचे ग्लोबल हेड सांगतात, सर्व कार निर्माते कारमालकाचा हा वेळ वाचावा यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कंपन्या मास्टरकार्डला पेमेंटयोग्य बनवित आहेत. जेंटेक्स कॉर्पने सादर केलेल्या तंत्रज्ञानानुळे रियर व्ह्यू मिरर फेस डिटेक्शन करून मालकाची असली पेमेंट अत्यंत सुरक्षितपणे करता येतात. पुढच्या वर्षापासून हे तंत्रज्ञान कारमध्ये वापरात येईल. जनरल मोटर्स वर्षअखेर २० लाख कार्समध्ये हे ऑनस्टार गो अॅप इन्स्टॉल करणार आहे. त्याचा वापर डिजिटल वॉलेटसारखा होऊ शकतो.

Leave a Comment