नवी दिल्ली: आपली नवीकोरी दमदार स्पोर्ट्स बाईक यामाहा एफझेड २५ यामाहा कंपनीने भारतात लॉन्च केली असून या बाईकची किंमत १.१९ लाख रूपये ऐवढी ठेवण्यात आली आहे. तरूणाई डोळ्यासमोर ठेवून या बाईकला खासकरून तयार करण्यात आले आहे. स्पोर्ट्स बाईकची आवड असणा-यांना ही बाईक नक्की आवडेल अशी आशा कंपनीने केली आहे.
यामाहाने ही दमदार बाईक भारतीयांसाठी लॉन्च केली आहे. या आकर्षक आणि दमदार बाईकमध्ये २४९ सीसीचे सिंगल सिलेंडर फ्युअल इजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. तर ५ स्पीड गिअर बॉक्सही देण्यात आला आहे. कंपनीने दावा केला आहे की, त्यांची ही दर्जेदार बाईक ४३ किमी प्रतिलीटर एवरेज देणार आहे. यासोबत या बाईकमध्ये २८२ एमएम फ्रन्ट डिस्क ब्रेक आणि २५७ एमएमचा रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.
यामाहाची नवी स्पोर्ट्स बाईक भारतात लॉन्च
यासोबतच अनेक आकर्षक फिचर्सही या बाईकमध्ये देण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स देण्यात आले आहेत. ही आकर्षक बाईक तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बॅलेस्टीक ब्ल्यू, वॉरिअर व्हाईट आणि नाईट ब्लॅक रंगांमध्ये ही बाईक मिळणार आहे. यामाहाची ही बाईक बाजारातील इतरही स्पोर्ट बाईक्सना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.