आयडीएस इंडिया या रिसर्च फर्मने नुकत्याच केलेल्या सर्वक्षणात नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्टफोनची विक्री ३०.५ टक्यांनी घसरल्याचे दिसून आले आहे. देशाच्या प्रमुख ५०० शहरात स्मार्टफोन विक्रीतील घट नोंदविली गेली आहे.दिवाळीच्या सुट्टयानंतर ही परिस्थिती आणखीनच बिघडल्याचे निरीक्षणही यात नोंदविले गेले आहे.
नोव्हेंबरमध्ये स्मार्टफोन विक्रीत ३० टक्के घट
या संदर्भात आयडीएसच्या अधिकारी उपासना जोशी म्हणाल्या, ८ नोव्हेंबरला नोटबंदी जाहीर जाहीर झाल्यामुळे स्मार्टफोन बाजाराच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला. कॅश टंचाईमुळे ग्राहकांची मागणी घटली तसेच वितरण पातळीवरही परिणाम झाला. देशाच्या बहुतेक सर्व शहरात विक्रीत घट दिसून आली मात्र फेब्रुवारी २०१७ पासून पुन्हा एकदा स्मार्टफोन विक्री पूर्वपदावर येण्यास सुरवात होईल असे संकेतही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.