नवीन ग्राहकांसाठी ‘बीएसएनएल’ची योजना


नवी दिल्ली – बीएसएनएलकडून खाजगी क्षेत्रातल्या दुरसंचार कंपन्यांना टक्कर देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी नवीन योजना सुरू करण्यात येत असून खास नवीन प्रिपेड कार्डधारकांसाठी ही योजना असून, ग्राहकाला यामध्ये दररोज ३० मिनीटे मोफत एसटीडी तसेच स्थानिक कॉल करता येणार आहे. अन्य नेटवर्कवरील कॉलचाही याअंतर्गत समावेश असून त्यासाठी १४९ रुपये एवढे मासिक शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

४३९ रुपये एकदाच भरून तीन महिन्यासाठी लाभ घेण्याचा पर्याय ही ग्राहकांना देण्यात आल्याचे कंपनीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले असून, ग्राहकांना ३०० एमबी डाटा ही या योजनेतंर्गत वापरायला मिळणार आहे. अधिकतर दुरसंचार कंपन्याकडून आपल्या नेटवर्क अंतर्गतच मोफत कॉलिंगची सुविधा देण्यात येते. बीएसएनएल उत्कृष्ट तसेच किफायतशीर सेवा पुरवण्यात कायमच अग्रस्थानी राहिले आहे. त्यानुसार आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या अनेक योजनेमध्ये या मोफत कॉलिंग योजनेचाही समावेश झाला आहे. दुरसंचार सेवा क्षेत्रात स्पर्धा असतानाही मार्च २०१५ पासून आतापर्यंत कंपनीच्या बाजारपेठेतील हिस्सेदारीत १ टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीचे संचालक अनुपम मिश्रा यांनी सांगितले.

Leave a Comment