१० लाखांपेक्षा अधिकची रक्कम जमा भरणा-यांची चौकशी सुरु


नवी दिल्ली : आपल्या बँक खात्यात अनेकांनी नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर उपलब्ध स्रोतांपेक्षा अधिकची रक्कम बँकेत जमा केल्याचे निर्देशनास आल्यामुळे १० लाखांपेक्षा अधिकची रक्कम बँकेत भरणा-या खातेदारांची चौकशी आयकर विभागाने सुरु केली आहे. बँकेत संशयास्पद रक्कम जमा करणा-या खातेदारांवर आयकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सहकारी बँकांमध्येही रक्कम जमा करण्यांचा समावेश आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभाग पहिल्या टप्प्यात त्या बँकांच्या खात्यांवर लक्ष ठेवून आहे. यामध्ये केवासी नियमांचे पालन केले गेले नाही. यामध्ये कॅश जमा करणा-या व्यक्तींचे इनकममध्ये साम्य नाही. तसेच १० लाखांपेक्षा अधिकची रक्कम बँकेत जमा करणा-यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment