उबेरईट अॅप लवकरच भारतात


अॅप आधारित टॅक्सी सेवा उबेर ने लवकरच भारतात उबेरईट हे खाद्यपदार्थ डिलिव्हरी अॅप लाँच केले जात असल्याचे जाहीर केले आहे. त्याच्या तारखेची घोषणा लवकरच केली जाणार आहे. २०१४ मध्ये अमेरिकेत प्रायेागिक तत्त्वावर हे अॅप लाँच केले गेले होते व आता जगभरातील विविध ५८ शहरात त्याचा विस्तार झाला आहे. यात बँकॉक, सिंगापूर, टोक्यो, हाँगकाँग, ताईपेई यांचा समावेश आहे.

या विषयी माहिती देताना आशिया पॅसिफिकचे प्रमुख एलन पेन म्हणाले, भारतात हे अॅप लाँच करण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतातली आमची ही महत्त्वपूर्ण गुंतवणूक असेल. यामुळे फूड इंडस्ट्रीत अभूतपूर्व बदल घडून येणे शक्य आहे. कॅब सव्र्हिस तंत्रज्ञानावरच या अॅपचे तंत्रज्ञान बेतले गेले आहे. भारतातील विविध शहरातील रेस्टॉरंटबरोबर त्वरीत डिलिव्हरीसाठी करार केले जात आहेत. अर्थात ही सेवा देणारी उबेर ही पहिली कॅब कंपनी नाही. यापूर्वी ओलानेही ओला कॅफे नावाने किराणा सामान घरपोच देण्याची सेवा सुरू केली होती. मात्र झोमोटो व अन्य कंपन्यांशी स्पर्धा करणे अशक्य झाल्याने ती वर्षभरात बंद केली गेली होती.

Leave a Comment