हे लांब पाय बनवू शकतात जागतिक विक्रम


मेलबर्न – ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये रहाणारी तत्कालीन मॉडेल आणि दोन मुलांची आई कॅरोलिन ऑर्थर ही महिला जगातील सर्वात लांब पायांचा जागतिक विक्रम तोडण्याच्या प्रयत्नात आहे. हा विश्वविक्रम सध्या ज्याच्या नावावर आहे त्याला कॅरोलिन आवाहन देणार आहे. तिच्या पायाची लांबी ५१.५ इंच आहे.

३९ वर्षीय कॅरोलिनला वाटते की ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत तिचे पायच सर्वात लांब पाय आहेत आणि तिने हा दावा केला आहे. सध्या हा रेकॉर्ड रशियाच्या स्‍वेतलाना पानक्रातोवाच्या नवे असून तिचे पाय ५१.९इंच लांब आहेत. कॅरोलिनची उंची ६ फुट २ इंच असून तिच्या शरीरात ६९ टक्के योगदान पायाचे आहे. यामुळे तिला तिचे कपडे निवडताना देखील खूप अडचणीचा सामना करावा लागतो.

Leave a Comment