नवी दिल्ली – केंद्र सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ केले असून ६६०.५ कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. ज्या शेतकऱ्यांनी सहकारी बॅंकेकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अल्पमुदतीचे कर्ज घेतले होते त्यावर व्याज लागणार नसल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे.
सरकारने माफ केले पीककर्जावरील ६६० कोटींचे व्याज
त्याचबरोबर या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहे. क्योटो प्रोटोकॉलच्या हरित वायूच्या उत्सर्जन कराराच्या मुदतवाढीस मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच अनिसाबाद येथे ११.३५ एकर जागा विमानतळ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे आयआयएममध्ये पदविका ऐवजी पदवी प्रदान केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी डिग्री मिळणार आहे. प्रगती मैदान येथे सांस्कृतिक केंद्रासाठी २,२५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.