व्हायरल झाला ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड’सोबत परवेझ मुशर्रफांचा व्हिडिओ


नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियात पाकिस्तानाचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एक अज्ञात महिलेसोबत थिरकताना परवेझ मुशर्रफ २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील ‘दिल्ली वाली गर्लफ्रेंड’ या गाण्यावर नाईट क्लबमध्ये या व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ पाकिस्तानमधील प्रसिद्ध टॉक शो होस्ट हमीद मीर यांनी ट्विट केला आहे. आणखी एका व्हिडिओत मुशर्रफ त्यांची पत्नी सेहबा मुशर्रफ यांच्यासोबत थिरकताना दिसत आहेत.

Leave a Comment