मर्सिडिज बेंझने लाँच केली अत्याधुनिक फिचर्ससह लक्झरी व्हॅन


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी मॅर्को पोलो होरीझॉन ही लक्झरी व्हॅन जर्मनची प्रसिद्ध वाहननिर्माता कंपनी मर्सिडीजने नुकतीच लाँच केली असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश या लक्झरी कारमध्ये असणार आहे. या व्हॅनमध्ये व्ही-क्लास डिझेलचे इंजिन देण्यात आले आहे. १८८एचपीची पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. या इंजिनमध्ये मर्सिडीज ७जी ट्रॉनिक प्लस देण्यात आले आहे. ७ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, या लक्झरी कँपर व्हॅनमध्ये ८ लोकांना बसण्याची आसनव्यवस्था तसेच ३ लोकांना झोपण्यासाठी स्पेसही या व्हॅनमध्ये देण्यात आला आहे. याची किमत ३७ लाख ९३ हजार ७२७ रुपये आहे.