कर्नाटकात जन्मले अद्भूत बाळ


कर्नाटक: कर्नाटकमधील रायचूरमध्ये एका महिलेने चार पाय आणि दोन लिंग असलेल्या बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली असून या बाळाची प्रसुती नैसर्गिक झाली असून या बाळाला देवाकडून मिळालेली भेट बाळाच्या आईने मानले आहे. परिसरात सगळीकडे ही बातमी पसरली असून याची एकच चर्चा रंगली आहे.

रायचूर जिल्ह्यातील सिंधानूरे तालुक्यातील पुलादिनी गावातील रहिवाशी चेन्नाबासवा(२६) आणि ललिततम्मा(२३) यांना मुलगा झाला. पण त्याचे शरीर नॉर्मल नसल्याने त्या बाळाला विजयनगर इंन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेसमध्ये भरती करण्यात आले. येथे या बाळाला नवजात शिशु केंद्रात ठेवले आहे.

प्रसुती केलेल्या डॉक्टर वीरूपक्षा यांनी सांगितले की, मुलाच्या कुटुंबियांशी मी बोलल्यावर त्याला व्हीआयएमएसमध्ये रेफर केले. मुलाच्या तब्येतीवर तेथील सर्जन लक्ष ठेवून आहेत. मला आशा आहे की, ते बाळ नॉर्मल व्हावे. तेच व्हीआयएमएसमधील डॉक्टर दिवाकर रेड्डी यांनी सांगितले की, सर्जन्सची एक टीम बाळाच्या देखरेखीसाठी आहे. ही आमच्यासाठी आव्हात्मक केस आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना बाळाच्या आईने सांगितले की, जन्मलेले बाळ सुखरूप आहे. आमच्याकडे महागड्या उपचारासाठी पैसे नाही आहेत. हे बाळ माझ्यासाठी देवाने दिलेली भेटवस्तू आहे. परिवारातील लोकांनी आणि डॉक्टरांनी मला मुलाला पुढील उपचारासाठी व्हीआयएमएसमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला. आशा करते की, तो नॉर्मल होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment