ओकिनावा रिझ भारतात लाँच


इलेक्ट्रीक स्कूटर क्षेत्रात ओकिनावा ऑटो टेकने त्यांचे नवे मॉडेल ओकिनावा रिझ लाँच करून भारतीय बाजारात पहिले पाऊल टाकले आहे. सोमवारी ही हायस्पीड इलेक्ट्रीक स्कूटर भारतात लाँच झाली. तिची एक्स शो रूम किंमत ४३७०२ रूपये आहे. पुढच्या तीन वर्षात कंपनी भारतात २७० ते २७५ कोटींची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख जितेन्द्र शर्मा म्हणाले भारतातील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या वाहतूक समस्या हे आमचे लक्ष्य असून पर्यावरण नुकसान न करता त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या स्कूटरसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरले गेले आहे. त्यात अँटी थेप्ट अलार्म, स्पीडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, स्मार्ट कंट्रोलर अशा सुविधा आहेत. स्कूटरला ट्यूबलेस टायर, अॅलॉय व्हील्स दिली गेली आहेत. ही गाडी १५० किलो पर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते. स्कूटरचे डिझाईन करताना १८ ते ६० वयोगटातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेतल्या गेल्या आहेत.

Leave a Comment