उद्या बदलाआपल्याकडील जुन्या नोटा…पण


नवी दिल्ली : पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा नोटाबंदीचा निर्णय लागू झाल्यानंतर बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. जरी आता ही मुदत संपली असली तरी देखील २५ जानेवारीला अप्रवासी भारतीय किंवा जे नोटाबंदीच्या काळात देशाबाहेर होते. असे सर्व लोक रिझर्व्ह बँकेकडे आपल्याकडील जुन्या नोटा बदलू शकणार आहेत.

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ८ नोव्हेंबरला घेतला होता. त्यानंतर आपल्याकडील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, देण्यात आलेल्या या मुदतीत काही अप्रवासी भारतीय आणि या काळात परदेशात असलेल्या नागरिकांना आपल्याकडील जुन्या नोटा बदलता आल्या नाहीत. त्यामुळे खास त्यांच्यासाठी त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांच्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्याची सवलत देण्यात आली आहे. असे लोक २५ जानेवारी म्हणजेच उदया सकाळी १० पासून रात्री ११ वाजेपर्यंत आपल्याकडील जुन्या नोटा बदलून घेऊ शकतात.

Leave a Comment