चार कॅमेर्‍यांचा लेनोव्हो फॅब टू प्रो लाँच


लेनोवोने भारतात फॅब टूप्रो हा स्मार्टफोन सादर केला असून तो फक्त फ्लिपकार्टवर २९९०० रूपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. गुगल टँगो टीमचे हे पहिलेच व्यावसायिक उत्पादन आहे. कॅमेरे आणि सेन्सर सेटअप हे या फोनचे वैशिष्ठ आहे.फोनसाठी अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस आहे तसेच इंटरनल मेमरी ६४ जीबी आहे. हा फोन ड्युल सिम आहे.

या फोनसाठी ६.४ इंची क्यूएचडी आयपीएस डिस्प्ले, ४ जीबी रॅम दिली गेली आहे. फोनसाठी चार कॅमेरे आहेत.१६ एमपीचा रियर, ८ एमपीचा फ्रंट त्याचबरोबर डेप्थ सेंसिग इन्फ्रारेड कॅमेरा व मोशन ट्रॅकिंग कॅमेरा दिला गेला आहे. त्यावर ३६० डिग्री व्हिडीओ तसेच ४के व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात. मागच्या बाजूस फिंगरप्रिट सेन्सर आहे. फोनसाठी ४०५० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. तसेच थ्री डी साऊंड रेकॉडिगची सुविधाही दिली गेली आहे. स्पेशल टँगो स्टोर मध्ये २५ अॅप्स दिली गेली आहेत व वर्षभरात त्यांची संख्या १०० वर नेली जाणार आहे.

Leave a Comment