एचपीचा लॅपटॉप आहे जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप


मुंबई – एचपी या कंपनीने काही दिवसांपूर्वीच ॲपलच्या मॅकबूक एअर पेक्षाही स्लिम असणारा लॅपटॉप बाजारात आणला आहे. मात्र स्वत:च्याच वैशिष्ट्याच्या बाबतीत सर्वात पातळ लॅपटॉप निर्माती कंपनी म्हणून जगभरात ओळख प्रस्थापित करणाऱ्या ॲपलवर यामुळे मागे राहिण्याची वेळ आली आहे. मॅकबूक एअर हा १.७० सेंटिमीटर इतका पातळ आहे तर एचपीने लॉंच केलेला ‘एचपी स्पेक्टर’ हा १.०४ सेंटिमीटर इतका पातळ आहे. वजनाच्या बाबतीतही एचपी स्पेक्टर आघाडीवर आहे. स्पेक्टरचे वजन १ किलो १ ग्रॅम असून मॅकबूक एअरचे वजन १ किलो ३५ ग्रॅम आहे. त्याचबरोबर मॅकबूक एअरचा सौंदर्य, वजन आणि पातळपणा या बाबतीत पुढे असल्याचा दावा एचपी स्पेक्टरने खोडून काढला आहे. पाहता क्षणी भूरळ घालेल असा हा लॅपटॉप आहे.

Leave a Comment