ई वॉलेटवर सायबर क्रिमिनल्सचा डोळा


भारतात नोटबंदी नंतर डिजिटल पेमेंटच्या व्यवहारात झालेली प्रचंड वाढ सायबर क्रिमिनल्सच्या पथ्यावर पडली असून या क्रिमिनल्सनी ई वॉलेटस आपले मुख्य टार्गेट बनविले असल्याचे सिक्युरिटी कंपनी एफ सिक्युअर यांचे म्हणणे आहे. त्यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालानुसार पॉईट व सेल्स डिव्हायसेस तसेच मोबाईल वॉलेटला मालवेअरचा धोका कित्येक पटीने वाढला आहे.

गेल्या कांही आठवड्यात भारतात या माध्यमातून होणारे व्यवहार लक्षणीयरित्या वाढले आहेत त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी परिस्थिती चांगली तर ग्राहकांसाठी परिस्थिती बिकट बनली आहे. यासाठी बेस्ट सिक्युरिटी प्रॉडक्ट देण्याची गरज आहे. हा अहवाल थ्रेट, लँडस्केप इंडिया २०१६ अॅन्ड बियाँड या नावाने प्रसिद्ध केला गेला आहे. त्यानुसार मोबाईल वॉलेट, टेलिकॉम वॉलेट, बँक वॉलेट, इंडिपेंडन्ट वॉलेट यांचा वापर खूप वाढला आहे त्यामुळे नव्या प्रकारचे धोके समोर येऊ लागले आहेत. त्यात स्मार्टफोन युजर्ससाठी एअरपुश, डॉगीन, फेक अॅप, एसएमस्पाय हे मुख्य धोके आहेत.

Leave a Comment