वैज्ञानिकांनी तयार केले जगातील कमी वजनाचे घडय़ाळ


जीनिव्हा – वैज्ञानिकांनी जगातील सर्वात कमी वजनाचे घडय़ाळ तयार केले असून ४० ग्रॅम वजनाचे हे यांत्रिक घडय़ाळ आहे. ग्राफिन या पदार्थापासून ते बनवण्यात आले आहे. ग्राफिन संमिश्राचे आरएम ५०-०३ हे घडय़ाळ असून वजनाने कमी आहे.

ग्राफ टीपीटी नावाने ग्राफिन संमिश्र हे ओळखले जाते व त्याचे वजन घडय़ाळात एरवी वापरल्या जाणाऱ्या पदार्थापेक्षा कमी आहे. एक अणूइतके ग्राफिन हे जाड असलेले द्विमितीय घटक आहे. ग्राफिन प्रथम २००४ मध्ये वेगळे काढण्यात यश आले होते त्यानंतर त्याचे अनेक उपयोग सामोरे आले. वाहने, विमाने, लवचिक मोबाईल फोन व टॅबलेट, ऊर्जा संकलन उपकरणे यांचा त्यात समावेश आहे. नवीन घडय़ाळाचा पट्टा ब्रिटनच्या मँचेस्टर विद्यापीठाने तयार केला असून त्यात रीचर्ड मिली व मॅकलारेन एफ १ या उत्पादक कंपन्यांचे सहकार्य आहे त्यात ग्राफिनचा वापर आहे. पट्टय़ाचे रबर ग्राफिनयुक्त असून त्यामुळे त्याचे यांत्रिक गुणधर्म वेगळे आहेत. एकूण घडय़ाळाचे वजन ४० ग्रॅम असून ते टिकाऊ आहे.

मँचेस्टर विद्यापीठाचे प्राध्यापक रॉबर्ट यंग यांनी ग्राफिनच्या समावेशाने अनेक सुधारणा करून वजन घटवता येते असे सांगितले. ग्राफिनचा समावेश त्यात केला असून क्ष किरण टोमोग्राफी तंत्राचा वापर यात केला आहे. यांत्रिक गुणधर्म तपासण्यासाठी रामन वर्णपंक्तीशास्त्राचा वापर केला आहे. ग्राफिनचा वापर केल्याने त्याच्या सुटय़ा भागांचे कामही सुधारते व आगामी काळात कमी वजनाची घडय़ाळे बाजारात येण्यास त्यामुळे मदत होऊ शकेल असे यंग यांनी म्हटले आहे.

Leave a Comment