वेग व स्टाईलचा शौक असलेल्यांसाठी दुकाती डिझलने त्यांची नवी लिमिटेड एडिशन बाईक डियावल डिझल सादर केली आहे. दुकाती व डिझल या दोन इटालियन कंपन्यांनी एकत्र येऊन सादर केलेली ही दुसरी बाईक आहे. मिलान फॅशन वीकमध्ये ती सादर केली गेली होती. यापूर्वी या दोन कंपन्यांनी एकत्र येऊन मॉन्स्टर ही बाईक सादर केली होती.
दुकातीची डियावल डिझल बाईक सादर
डियावल ची फक्त ६६६ युनिट बनविली जाणार आहेत. तिच्या डिझाईनवर फ्युचर वर्ल्ड थीमचा प्रभाव दिसून येत आहे. ही बाईक डेव्हीलची झलक दाखविते. बायबलमध्ये ६६६ हा आकडा डेव्हिलचा आकडा आहे. अँड्रीयो रोसो याने ही बाईक डिझाईन केली आहे.बाईकची किंमत १५.६९ लाख रूपये असून ती एप्रिल १७ पासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. बाईकचा टॉप स्पीड आहे ताशी १५५ मैल.
बाईकच्या फ्यूलटँकला रफ लूक दिला गेला आहे. स्टाईलसाठी वेल्डच्या खुणाही तशाच ठेवल्या गेल्या आहेत. पिरामिड आकाराची सीट लेदरपासून बनविली गेली असून त्यामुळे बाईकची स्टाईल वाढली आहे. नेव्हर लूक बॅक असे त्यावर लिहिले गेले आहे. बाईकची पॉवर बाईक वेड्यांचा होश उडविणारी असून तिला ११९८ सीसीचे इंजिन ट्वीन सिलींडरसह दिले गेले आहे.