अवघा एका मिनिटात ‘नोकिया ६’ सोल्ड आऊट


मुंबई : चीनमधील JD.com या ई-कॉमर्स वेबसाईटवर एचएमडी ग्लोबलने पहिला नोकिया स्मार्टफोन ‘नोकिया ६’चा फ्लॅश सेल केला. यात ‘नोकिया ६’ स्मार्टफोन जवळपास एका मिनिटात सोल्ड आऊट झाला. या स्मार्टफोनसाठी लाखोंच्या घरात नोंदणी करण्यात आली होती.

याबाबत चिनी वेबसाईट Anzhuo.cn ने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास एका मिनिटात ‘नोकिया ६’ स्मार्टफोनचे सर्व यूनिट विकले गेले. ‘नोकिया ६’ स्मार्टफोनची २४ तासात २ लाख ५० हजार जणांनी नोंदणी केली होती. नोकियाने हा स्मार्टफोन सध्या चीनमधील बाजारपेठेतच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत १६९९ युआन म्हणजेच भारतीय रुपयांत जवळपास १६ हजार ७५० रुपये एवढी आहे.

Leave a Comment