९००० कर्मचाऱ्यांना इन्फोसिसने दिला नारळ!


बंगळुरु : आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांना प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिसने कामावरुन कमी केले आहे. इन्फोसिसकडून मागील एक वर्षापासून कर्मचाऱ्यांची कपात केली जात असल्याचे कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षभरात टप्प्याटप्प्याने २ हजार कर्मचाऱ्यांना कमी करत आतापर्यंत ८००० ते ९००० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. तसेच कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही देण्यात येत असल्याचे कृष्णमूर्ती यांनी सांगितले आहे. ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचे २०१५ साली कंपनीचे एचआर म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या शंकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सध्या नोकरभरतीही थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे.

इन्फोसिसने मागील ९ महिन्यात ५७०० कर्मचाऱ्यांना कमी केले असून पुढील काही दिवसात अजून जवळपास २५०० कर्मचाऱ्यांना कमी केले जाईल. मागच्या वर्षी याच कालावधीत ऑटोमेशनमुळे जवळपास १७००० कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते.

Leave a Comment