शिरा बनला न सुरू झाली अर्थसंकल्पाची छपाई


दिल्ली- येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या छपाईची सुरवात पारंपारिक शिरा बनविण्यापासून सुरू झाली. गुरूवारी अर्थमंत्री अरूण जेटली, अर्थसचिव अशोक लवास, महसूल सचिव हसमुख आधिया, आर्थिक धोरणे सचिव शक्तीकांत दास, आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम व अन्य वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी या हलवा सेरेमनीत भाग घेतला. ही परंपरा दीर्घकाळ सुरू असून त्यानुसार मोठ्या कढईत शिरा केला जातो व बजेटशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचार्‍याना तो खायला दिला जातो. त्यानंतर बजेटची छपाई नॉर्थ ब्लॉक हाऊसमधील प्रेसमध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू होते.

यामागची भावना अशी की बजेटची छपाई सुरू झाल्यानंतर ती पूर्ण हेाऊन बजेट संसदेत सादर होईपर्यंत १०० वर अधिकारी, कर्मचारी छपाई सुरू असलेल्या भागात मुक्कामास असतात. या काळात ते फोनचा वापर करू शकत नाहीत तसेच कोणत्याही कारणानी बाहेर जाऊ शकत नाहीत. कुटुंबियांची भेटही या काळात ते घेऊ शकत नाहीत. यामुळे त्यांना शिरा खिलवून जणू निरोपच दिला जातो.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. षण्मुखम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ ला सादर केला होता.

Leave a Comment