…म्हणून वाढली शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या!


पुणे : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटानंतर पुण्यातील शनिवारवाड्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून परिणामी भारतीय पुरातत्व विभागाच्या तिजोरीतही भर पडली आहे.

डिसेंबर २०१५ मध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेमकहाणी उलगडण्यात आली होती. या चित्रपटात दाखवलेला शनिवारवाडा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहे. २०१६ मध्ये पर्यटकांची संख्येत तीन लाखांनी वाढ झाल्यामुळे आधी ९ लाख असलेली पर्यटकांची संख्या आता १२ लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये फक्त भारतीयच नाही परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

पर्यटकांमध्ये चित्रपटात दाखवलेल्या ‘शीशमहल’ची नेमकी जागा पाहण्यासाठी उत्सुकता असून सध्या ‘शीशमहल’ अस्तित्त्वात नाही. पण चित्रपटामुळे लोकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे, असे वारसा तज्ज्ञांनी सांगितले.

Leave a Comment