रिलायन्स जिओ ऑटो क्षेत्रातही करणार धमाल


मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर रिलायन्स जिओ फोरजी सेवा क्षेत्रात धमाल केल्यानंतर आता ऑटो क्षेत्राशीही जोडले जाणार आहे. कंपनीने असे एक खास उपकरण सादर केले आहे ज्यामुळे कारचालकांना अनेक उपयुक्त सूचना मिळू शकणार आहेत. इतकेच नव्हे तर कार चोरीस जात असेल तर त्याचा अॅलर्टही मिळू शकणार आहे. अर्थात हे एक प्रकारचे अॅप असून युजरला ते वापरण्यासाठी जिओ सिमचा वापर करावा लागणार आहे.

कंपनीतील वरीष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मोबाईल अॅप आहे व ते कारशी जोडलेले असेल. यामुळे कारमधील इंधन संपत आले असेल, बॅटरी लो असेल तर त्याची सूचना मिळेलच पण समजा कार चोरीस जात असेल तर त्याचा अॅलर्ट मालकाला मिळेल. वायफाय सुविधा असल्याने कार कोणत्या भागात आहे, कुठे चालली आहे याची माहिती मिळेल. ठराविक भौगोलिक क्षेत्रातच कार जाऊ शकेल. दुसरीकडे जात असेल तर त्याची सूचना मिळेल. कार बिघडली असेल तर तेही समजेल व दूरवरूनही कारचा एसी सुरू बंद करता येईल. कंपनी वाहन उद्येागातील कंपन्यांबरोबर या अॅप संदर्भात चर्चा करत असून लवकरच हे उपकरण बाजारात दाखल होईल.

1 thought on “रिलायन्स जिओ ऑटो क्षेत्रातही करणार धमाल”

Leave a Comment