शाओमीचा रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ लाँच


नवी दिल्ली : रेडमी सीरिजमधील रेडमी नोट४ हा स्मार्टफोन चायनीज हँडसेट मेकर शाओमीने गुरुवारी लाँच केला असून या फोनची विक्री फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर सुरु झाली आहे. ९,९९९ रुपये ऐवढी या नव्या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे. हा स्मार्टफोन दोन पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. २ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये तर ३ जीबी रॅमच्या स्मार्टफोनची किंमत १०,९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले, १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम या दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याची इंटरनल मेमरी माइक्रोएसडी कार्ड द्वारे 128जीबी पर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. २ गिगाहर्टझ ओक्टाकोरचा प्रोसेसर देण्यात आला आहे.

Leave a Comment