भारतात लॉन्च झाली टाटाची ‘हेक्सा’


नवी दिल्ली: आपली नवी कोरी शानदार कार एसयूव्ही टाटा हेक्सा टाटा कंपनीने लॉन्च केली असून टाटा आरिया या कारला ही कार रिप्लेस करणार आहे. या कारमध्ये टाटा सफारीचे २.२ लीटरचे VARICOR इंजिन बसवण्यात आले आहे. टाटाने स्पर्धा बघता या कारला हायटेक सेफ्टी फिचर्ससोबत बाजारात लॉन्च केले आहे. या कारचे एकूण ६ व्हेरिएंट्स लॉन्च करण्यात आले आहेत.

११.९९ लाखांपासून हेक्साची किंमत सुरू होणार असून एक्सई ४×२ व्हेरिएंट मॉडेल ११.९९ लाखाला, एक्सएम/एक्सएमए ही कार १३.८५ ते १७.४ लाखाला, एक्सटी/एक्सटीए ही कार १६.२० ते १७.४ लाखाला तर एक्सटी ४×४ ही कार १७.४९ लाख रूपयांना मिळणार आहे.

भारत, इटली आणि यूकेमध्ये डिझाइन स्टुडिओमध्ये टाटाच्या या नव्या कारचे डिझाइन करण्यात आले आहे. या कारमध्ये ४ सिलेंडर असलेले २.२ लीटरचे टर्बोचार्ज्ड वेरिकोर डिझल इंजिन देण्यात आले आहे. याचे बेस मॉडेल १४८ bhp असलेले आहे, जे ३२०Nm टार्क जनरेट करते. तेच या कारचे टॉप मॉडेल १५४bhp चे आहे, जे ४००Nm टार्क जनरेट करते.

टाटा हेक्सामध्ये ५ स्पीड मॅन्युअल, ६ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड ऑटोमॅटिक तीन ट्रान्समिशन ऑप्शन देण्यात आले आहेत. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये रिअर व्हिल ड्राईव्ह आणि ऑल व्हिल ड्राईव्ह पर्याय दिले आहेत. तेच ऑटोमॅटीक ट्रान्समिशनमध्ये केवळ रिअर व्हील ड्राईव्ह पर्याय देण्यात आला आहे.

टाटा कंपनीने या कारची बुकींग ११ हजार रूपयात सुरू केली असून डिलर्स सांगत आहेत की, जानेवारी २०१७ च्या शेवटी बुकींग सुरू होईल. या कारची आतापर्यंत किती बुकींग झाली आहे अजून समोर आले नाही पण असे मानले जात आहे की, या कारला ग्राहकांची पसंती मिळत आहे. ही शानदार कार एक उत्तम फॅमिल कार म्हणूनही लोकप्रिय होणार आहे. कारण कारमध्ये ६ सीटर आणि ७ सीटर असे पर्याय देण्यात आले आहेत.

Leave a Comment