बिअरच्या बाटल्यातून बनलेय थायलंडमधील अप्रतिम बुद्ध मंदिर


टाकावूतून टिकावू अथवा कचर्‍यातून कला या बाबी आता आपल्या अंगवळणी पडत आहेत. मात्र बौद्ध भिक्कू आणि बिअर हे कॉबिनेशन ऐकायला जरा ऑड वाटतेय ना? पण थायलंडमधील बौद्ध भिक्शूंच्या प्रयत्नातून जगातील अप्रतिम असे मंदिर बिअरच्या टाकावू बाटल्यातून बनविले गेले आहे व आज जगभरातील पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. थायलंडच्या सिस्केट भागात हे मंदिर उभारले गेले असून त्यासाठी हिरव्या व तपकिरी रंगाच्या बिअर बाटल्यांचा वापर केला गेला आहे.


वाईटातून चांगले कसे निर्माण होऊ शकते याचे हे मंदिर जिवंत उदाहरण मानले जाते. वट पा महा क्यई असे नांव असलेल्या या मंदिराला टेंपल ऑफ मिलीयन बॉटल्स असेही म्हटले जाते. १५ लाख बाटल्यांचा वापर या मंदिराच्या उभारणीसाठी केला गेला आहे. असे सांगतात की गावातील घाण, कचरा कमी करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी व्हावे म्हणून हे भिक्षू १९८० पासून बाटल्या जमवित होते. कांही वर्षातच त्यांच्याकडे इतक्या बाटल्या जमा झाल्या की त्यातून २० इमारती उभ्या राहू शकतील. शेवटी त्यातून हे मंदिर उभारले गेले त्याचबरोबर बाथरूम्स, बंगले, वॉटर टॉवर ही बनविले गेले. या मंदिराच्या भिंतीवर या बाटल्यातून अशी रंगसंगती व डिझाईन केले गेले आहे की त्यावरून नजर हटविणे मुश्कील होते. बाटल्यांच्या बुचांचा वापर मोझॅकसाठी केला केला आहे.

Leave a Comment