दुकातीची १२९९ सुपरलेगेरा बाईक लाँच


स्पोर्टस बाईकच्या शौकीनांसाठी दुकाती या जगप्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनीने १२९९ सुपरलेगेरा ही बाईक भारतात लाँच केली असून त्यांची भारतातील ही सर्वात महागडी बाईक आहे. या बाईकची किंमत आहे १ कोटी १२ लाख रूपये. (एक्स शो रूम दिल्ली). या बाईकचे बुकींग सुरू झाले आहे.

कार्बन फायबर फ्रेम, सबफ्रेम व व्हिल्स असलेली भारतातली ही पहिलीच बाईक आहे.या बाईकला क्विक शिफ्टर्ससह ६ स्पीड गियरबॉक्स दिला गेला आहे.तसेच सर्वात जादा परफॉर्मन्स व्हर्जनचे सुपरक्वार्डरो इंजिन दिले गेले आहे. ट्वीन सिलेंडरच्या इंजिनची ही बाईक दुकाती पॉवर लाँच सह आहे. इंजिन ब्रेक कंट्रोल फिचरसह सुरक्षेसाठी खास व्यवस्था केली गेली आहे. त्यत अॅल्युनिमियम व टायटॅनियम पासून बनलेल्या फ्यूल टँक, बॉश कॉनरिंग एबीएस सिस्टीम, स्लाईड कंट्रोल, पॉवर लाँच, ट्रॅक्शन कंट्रोल यांचा समावेश आहे. ही बाईक वजनाला अन्य बाईकच्या तुलनेत हलकी आहे.

Leave a Comment