खरीखुरी स्लिपिंग ब्युटी


फेरीटेलमध्ये कोणत्या तरी चेटकीणीच्या शापाने झोपी गेलेल्या राजकन्येची गोष्ट आपण ऐकली असेल. ब्रिटनमध्ये १६ वर्षीय बेथ गुडिअर ही प्रत्यक्षातली स्लीपिंग ब्यूटी अस्तित्त्वात आहे. बेथ एकदा झोपी गेली की सहा सहा महिने उठत नाही. एका दिवसात ती दोनच तास जागी राहू शकते. अर्थात बेथवर ही पाळी तिच्या आजारामुळे ओढविली आहे.

बेथची आई सांगते तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र तेथील चाचण्यात तिला नक्की काय विकार जडला हे कळू शकले नाही. तिच्या सर्व चाचण्या फेल गेल्या. तेव्हा अखेर ती स्लीपिंग ब्यूटी सिंड्रेामची शिकार झाल्याचे सांगितले गेले. तब्येत चांगली राहावी यासाठी ती जेव्हा जागी होते तेव्हाच खाणे पिणे करून घेते.

आजपर्यंत डॉक्टरला भेटण्यासाठी तिने एकदाच घर सोडले आहे. तिला हालचालीसाठी व्हिलचेअर लागते व थोडे बोलले तरी ती थकून जाते. तिच्यासाठी चोवीस तास केअरटेकर ठेवला गेला आहे कारण ती कधी जागी होईल हे सांगता येत नाही मात्र जागी झाली तर तिच्या गरजेसाठी जवळ कुणीतरी हवे म्हणून ही काळजी घेतली जाते. तिला कुणीही मैत्रिणी भेटायला येत नाहीत कारण ती कधी जागी असेल व असली तरी कधी झोपी जाईल हे सांगताच येत नाही.

Leave a Comment