क्वासाकी लाँच करणार ११ लाखाची बाईक


नवी दिल्ली : जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी क्वासाकीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी झेड ९०० बाइक नुकतीच लाँच केल्यामुळे आता ही बाइक ग्राहकांना लवकरच मिळणार असून या नव्या बाइकमध्ये ९४८ सीसीचे इनलाइन-फोर युनिटचे इंजिन देण्यात आले आहे. या बाइकमध्ये १२६ हॉर्सपॉवरचे शक्तिशाली इंजिन देण्यात आले आहे. ३०० एमएमचे डय़ुअल डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. एक्झॉस्ट सिस्टिमचा ३५एमएम पाइप देण्यात आला आहे. या बाइकमध्ये २ इंटरनल चेम्बर्स देण्यात आले असून या बाईकची किमत ११ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

Leave a Comment