अजिंठ्याच्या जतनासाठी जपानचे ‘वाकायामा’ मॉडेल


भारतातील स्थानिक पुरातन वारसा जतन करण्यासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी जपानच्या अधिकाऱ्यांनी अजिंठा येथे कार्यशाळा घेतली. मंगळवारी ही कार्यशाळा झाली. यावेळी जपानमधील वाकायामा येथील तीन अधिकाऱ्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.

जपानच्या पश्चिमेला असलेल्या वाकायामा प्रीफेक्चरच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांशी यावेळी चर्चा केली. वाकायामा येथे कुमानो कोदो मार्ग नावाचा एक भाग असून हा प्राचीन तीर्थयात्रा मार्ग आहे. युनेस्कोने त्याचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये केला आहे. तेथील रहिवाशांनी सांस्कृतिक वारसास्थळांना सुरक्षित राखण्यासाठी पद्धत विकसित केली आहे. भारतातही तीच पद्धत राबविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

कार्यशाळेत बोलताना वाकायामा प्रीफेक्चरचे अधिकारी हिदेकाज़ु हिराइ म्हणाले, की स्थानिक वारसा जतन करणे हे स्थानिक लोकांसाठी मह्त्वाचे आहे. माध्यमिक शाळेतील 100 विद्यार्थ्यांसहित सुमारे 100 स्थानिक लोकांनी या कार्यशाळेत भाग घेतला, असे जपानच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment