फोक्सवॅगन लाँच केली कॅम्पर व्हॅन


नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी नवी कॅम्पर व्हॅन नुकतीच जर्मनची प्रसिद्ध ऑटोकार निर्माता कंपनी फोक्सवॅगनने लाँच केली. या मिनी व्हॅनमध्ये इलेक्ट्रिक पॉवरवर काम करणा-या गोष्टींचा समावेश करण्यात आला असून व्हॅनमध्ये कर्न्व्हटेबल केबिन, आगूमॅटिड रिऍलिटी एच. यू. डी इंजिन, ऑटोमॅटिकपणे ही कार काम करु शकेल. याचा वापर होणारा पायलट मोड २०२५ पर्यंत काम करणार आहे. राडार, अल्ट्रा सॉनिक सेंसर्स आणि कॅमेरे याला आपोआप मदत करु शकणार आहे. आय. डी. बज कॉन्सेप्टचे डिझाइन जुन्या कॅम्पर व्हॅनशी संलग्न असणार आहे. या नव्या व्हॅनचे स्टाइल, लाइटनिंगमध्ये मॉडर्न लुक देण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये २ इलेक्ट्रिक मोटार देण्यात आले असून याच्या माध्यमातून प्रदूषणरहित व्हेईकल बनवण्यात येणार आहे.

Leave a Comment