नोकिया आणणार फोल्डेबल स्मार्टफोन!


स्मार्टफोन उत्पादक कंपनी नोकियाला फोल्डेबल स्मार्टफोन बनवण्याचे पेटंट मिळाले आहे. त्यामुळे आता नोकिया फोल्डेबल स्मार्टफोन लवकरच लॉन्च करू शकते. नोकियाला यूएस पेटेंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून २०१६च्या सप्टेंबरमध्ये फोल्ड होणाऱ्या डिव्हाईसचे पेटंट देण्यात आले आहे. या पेटंटसाठी नोकियाने डिसेंबर २०१३ला अर्ज केला होता. यामध्ये एक छोटासा पॉकेटमिरर सारखा डिव्हाईस दिसतो, जो मधूनच फोल्ड होऊ शकतो. डिव्हाईसच्या दोन्ही बाजूला समान भाग असून ज्याला जोडून मोठा डिस्प्ले तयार होतो. मात्र नोकियाच्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या दाव्याला अजून बळ मिळणार आहे. कारण कंपनीने आणखी एका पेटंटसाठी अर्ज केला आहे, तो म्हणजे फोल्डेबल बॅटरीसाठी. कंपनीकडून हा स्मार्टफोन पुढील महिन्यात होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर केला जाऊ शकतो.

Leave a Comment