चोरीला गेलेला मोबाईल सहज मिळवू शकता परत


बसमध्ये, ट्रेनमध्ये किंवा मार्केटमध्ये मोबाईल चोरणा-यांची संख्या वाढल्याने मोबाईल चोरीला जातो. स्मार्टफोन म्हणजे सध्या आपला एक मिनी कॉम्प्युटरच आहे. आपण त्यात आपला महत्त्वाचा डेटा ठेवतो. जर तो मोबाईल कुणाच्या हाती आला तर मोठे नुकसान होऊ शकते. पण आता मोबाईल हरवला तर घाबरण्याची चिंता नाही. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत की जर तुमचा कुणी मोबाईल चोरला, तर तुम्हाला त्याचे लोकेशनही मिळू शकतं. तसंच तुम्ही त्या मोबाईलमधला डेटाही डिलीट करू शकता.

त्यासाठी तुम्हाला एवढेच करावे लागेल;
आज जवळपास सर्व मोबाईलमध्ये अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर असते. आपल्या मोबाईलमध्ये हे अॅप जर नसल्यास गुगलच्या प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा. डाऊनलोड झाल्यानंतर अॅप सुरू करा आणि स्वीकारा (Accept) वर क्लिक करा. Accept केल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये हे अॅप ऍक्टिवेट होते.

मोबाईल हरवला किंवा चोरीला गेल्यावर तुमचा मोबाईल शोधण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटर किंवा टॅबलेटवर तुमचा जो इमेल आयडी गुगल प्लेस्टोरवर आहे, त्या मेल आयडीतून लॉग इन करा. त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या दिशेने काही अॅप आयकॉन दिसतील. तिथे दिसणा-या ‘प्ले’ या आयकॉनवर क्लिक करा. प्ले स्टोर सुरू झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला वरच्या दिशेने सेटिंग हा आयकॉन दिसेल. तिथ असणा-या अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर वर क्लिक करा. अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर सुरू झाल्यावर तुमच्या हरवलेल्या मोबाईलचे मॉडेल नंबर सिलेक्ट करा. आता तुमच्या मोबाईलमध्ये आलेल्या मॅपमध्ये मोबाईलचे लोकेशन दाखवले जाईल.

मोबाईलच्या नावासह तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.

1) RING: यावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलची पाच मिनिटापर्यंत रिंगटोन वाजत राहिल.

2) LOCK: यावर क्लिक केल्यास एखादा नवीन पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा मोबाईल लॉक करू शकता. याशिवाय तुम्ही एकदा टेक्स मॅसेजही लिहू शकता. जो मोबाईलच्या लॉक स्क्रिनवर येणार. तुम्ही तुमचा दुसरा नंबरही यात सेव्ह करू शकता. ज्याच्या कॉल आयकॉनवर जाऊन तुम्ही ज्याला मोबाईल मिळाला त्याच्याशी बोलू देखील शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या नंबरवरून कॉल करत आहात तो नंबर स्क्रिनवर दिसणार नाही.

3) ERASE: यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या मोबाईलमधील संपूर्ण डेटा डिलिट करू शकता.

Leave a Comment