एचपीच्या झेड टू मिनी वर्कस्टेशनचे अनावरण


एचपी कंपनीने जगातील पहिल्या मिनी वर्कस्टेशनचे अनावरण केले असून झेड टू मिनी असे या वर्कस्टेशनचे नाव आहे. हे वर्कस्टेशन कंप्यूटर एडेड डिझाईन व अन्य गणनेवर आधारीत उद्योगांना समोर ठेवून विकसित केले गेले आहे. या वर्कस्टेशनची विक्री २५ जानेवारीपासून सुरू होत असून त्याची किंमत आहे ७२ हजार रूपये.

हे वर्कस्टेशन पारंपारिक बिझिनेस क्लास टॉवर पीसीपेक्षा ९० टक्के छोटे आहे व फक्त २.३ इंच उंचीचे आहे. एकावेळी सहा डिस्प्लेला समर्थन देण्याची त्याची क्षमता आहे असे कंपनीचे वरीष्ठ अधिकारी केतन पटेल यांनी सांगितले. ते म्हणाले, भविष्यातील वर्कस्पेस लक्षात घेऊन ते बनविले गेले असून पारंपारिक पीसी पेक्षा ते दुप्पट शक्तीशाली आहे. विंडोज १० प्रो अथवा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमसह चालणारा नेक्स्ट जनरेशन झेऑन प्रोसेसर त्यासाठी दिला गेला आहे. त्याचसोबत एन व्हिडीआचे प्रोफेशनल ग्राफिक कार्ड व एचपी झेड टर्बो ड्राइव्हही दिला गेला आहे.

Leave a Comment