येथे मिळतो जगातील सर्वात स्वस्त आयफोन


जगभरातील युवापिढीचा स्टाईल आयकॉन असलेला स्मार्टफोन म्हणजे आयफोन असून आयफोन हा आपल्या ब्रांड इमेज आणि किमतीच्या बाबतीत सगळ्यात वेगळा आहे. हा फोन आपल्याकडे असावा असे प्रत्येकाला वाटते. हा फोन एवढा महाग आहे की प्रत्येकाच्या खिशाला परवडणारा नाही पण असे असताना जगात एक अशी जागा आहे जिथे ५० ते ६० हजारांना मिळणार आयफोन फक्त २७,३०० रुपयात मिळतो.

हे ठिकाण आफ्रिकेतील अंगोला हे असून येथे लेटेस्ट आयफोनची किमत २७,३०० रुपये असल्याचा खुलासा टेक्‍नोलॉजी प्राईज इंडेक्‍सच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये एकाच मोबाईलच्या जगातील वेगवेगळ्या ठिकाणच्या किमतीची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आफ्रिकेतील अंगोलामध्ये सर्वात स्वस्त आयफोन मिळतो हे स्पष्ट झाले आहे.

हा फोन येथे कन्झ्युमर प्रोडक्टवर असलेला टॅक्स कमी असल्यामुळे स्वस्त मिळतो. आयफोनच्या किमती संदर्भात या रिपोर्टमध्ये ७२ देशांचा उल्लेख करण्यात आला आहे. अंगोलानंतर जपान, चीन, फिनलंड आणि युएई या देशांची नावे येतात जिथे आयफोन स्वस्त मिळतो.

Leave a Comment